गंमत

*क्रमांक 2..असे किस्से अशी गम्मत ..स्वभावाची वेगळीच जम्मत..!  एक नजर चुक ..!*

*नवीन नवीन वर्धेला  एलआयसी मध्ये अपॉईंटमेंट झाली आणि काय तो केवळ 850 रूपयाच्या  नवीन नौकरीचा आनंद..!* *नवीन काम .. नवीन सहकारी ..काहीसे गोरे गोमटे कडक शिस्तीचे  शाखा प्रबंधक..! शाखे मध्ये वावरायचे कसे याचा कुठलाच अनुभव नव्हता* . 🧐🧐 *अकाउंट्स विभागात कलेक्टिंग बँकेच्या कामाचे नवीनच स्वरूप माझ्या वाट्याला आले .  हे सर्व बघून सुरवातीला मी भांबाउन गेलो. भीती अशी की काही चुकले तर वरिष्ठ रागावतील. म्हणून खाली मान घालून चुपचाप काळजीपूर्वक दिलेले काम करायचो.* *त्यातच वरिष्ठांची कामाची तत्परता व निष्ठा बघून त्यांच्या प्रती नैसर्गिक आदर वाटायला लागला.जवळपास प्रत्येक विभाग प्रमुखाला नवीन फ्रेश सहकारी खूप* *वर्षात मिळाल्यामुळे तेही आनंदात होते. संपूर्ण  शाखा “गुलजार” झाली. बगीच्यात रंगीत फुलांची बहार आली.असे वाटत होते की कित्येक वर्षात शाखेत चैतन्य आले*.  *त्यातही आमच्या सोबत सुंदर ,सुरेख, छान छान असलेल्या कॉलेज गोइंग महिला सहकारी जास्त.! नवीन दोस्ती ..! नवीन विभाग ..!  त्यामुळे नवीन लोकांना किती शिकवू आणि किती नाही असे जुन्या (पुरुष) कर्मचार्‍यांना होऊन गेले. मॅडम* *थोडा वेळ  कॅल्क्युलेटर देता का? इ.संवाद कारण असताना नसताना चालायचे. तोच अनुभव आम्ही घेत होतो . पण त्यांची सहकार्याची भावना व काम शिकवण्याची हातोटी व त्यांचा अनुभवाचा ज्ञानाचा  अभ्यास याला खरोखरच तोड नव्हती असे आजही वाटते.*

*त्या वेळेस आमच्या पहिल्या शाखा प्रबंधकांचा सर्व स्टाफ वर प्रचंड दरारा होता. त्यांचा  “राऊंड” होणार असे काना वर आल्याबरोबर सर्व स्टाफ आपआपल्या जागेवर अगोदरच भीतीपोटी येऊन बसत असे.केबिन मध्ये कुणाला बोलावले तर घाबरून जात असु.कुणी जागेवर दिसले नाही तर विभाग प्रमुखांकडे चिठ्ठी पाठवून ते संबंधित कर्मचार्‍याला बोलावून घेत.पण ते कधीच रागावत नसत ..आवाज कधीच मोठा नव्हता. पण बोलण्यात आदरयुक्त जरब व कमालीची शालीनता होती. विविध* *उदाहरणांनी समजावून सांगण्याची व तक्रार सोडविण्याची कल्पक कला त्यांना अवगत होती. “ अरे रावणाने रामा सोबत भांडण केले.. मग वाईट कुणाचे झाले ..? रावणाचेच ना? तुला तुझे वाईट झालेले आवडेल का? नाही ना? मग रावणा सारखे  भांडण नाही करायचे..?” सर, आपल्या पी एस डिपार्टमेंट चा  एक जण कामाच्या वेळेस रेकॉर्ड रुम मध्ये झोपला आहे…! “ अरे थोडावेळ झोपू दे त्याला..!* *त्याची तब्येत बरी नसेल.. करू दे आराम त्याला? तुझी तब्येत बरी नसेल तर तू पण शेजारी झोपून जा..! मी येईन दोघांना उठवायला..!”अशा प्रकारे अत्यंत आपुलकीने तक्रारी सोडविण्याची कला त्यांना लाभली होती. तक्रार करता मग लाजून जायचा. अशा  चर्चे नंतर कर्मचारी रिलॅक्स होत असे.. मात्र  केबिन मध्ये बोलावले असा निरोप मिळाल्या बरोबर तो घामाघूम होत असे*. *कारण केबिन मध्ये समोर काय वाढून  ठेवले आहे हे त्याला माहीत नव्हते..!*

*सर्व डिपार्टमेंट चे सर्व महत्वाचे पेपर्स शाखा प्रबंधकांकडे  सहीला जात असत व काळजी पूर्वक वाचून ते* *सही करत व काही चुका असल्यास सांगत .त्यांचा रबरी  शिक्का त्यांच्या कडेच असे.अशातच सर्व क्लास वन  ओफिसर्सच्या सॅलरीचे पे फिक्सेशन झाले.आनंदी आनंद झाला.*  *एरिअर्स काढायची घाई झाली. आलेल्या सर्क्युलर प्रमाणे नियमा नुसार ओएस डिपार्टमेंट च्या नवीनच महिला सहकार्यावर कामाची जबाबदारी आली.पण तिने  सुद्धा कामाच्या प्राथमिकतेचे महत्व जाणून काम अतिशय प्रामाणिक पणे व*  *तत्परतेने हातात घेतले व स्टेटमेंट तयार करायला घेतले. एरिअर्स ऑफ क्लास वन ऑफिसर्स*….. *नेम ऑफ द ऑफिसर , डुयरेशन, रेट, टोटल अमाऊंट, डीडक्शन, नेट पेमेंट असे साधे स्टेटमेंट होते. मेहनतीने तीन तास खपून तिने ते स्टेटमेंट अतिशय प्रामाणिकपणे तयार करून व विभाग प्रमुखाची सही घेऊन शाखा प्रबंधकांकडे सॅक्शन करिता पाठवून दिले.आता विभाग प्रमुख व महिला सहकारी याचे काम संपले होते व ते रिलॅक्स मूड मध्ये होते..*

 *..आणि हाय रे ..अर्ध्या तासाने शाखा प्रबंधकांचे बोलावणे दोघांनाही आले.. ! काही तरी गडबड झालेली होती. तरी दोघेही घाबरतच केबिन मध्ये गेले.*.

 *या बसा..हे स्टेटमेंट तुम्ही तयार केले मॅडम..?”काहीसा करडा आवाज*

*“हो सर ..मिच प्रायोरिटी वर तयार केले, सर्वांना लवकर रक्कम मिळावी म्हणून”*

  *ओह.. गुड जॉब डन .नाईस वर्क ..”*

*“सर , तुम्ही हे चेक केले?” विभाग* *प्रमुखांना तसाच करडा प्रश्न*

*“हो सर ..सर्व कॅलक्युलेशन व डीडक्शन तर फॉर्मुल्या प्रमाणे बरोबर  आहेत”*

  *ओके सर..फक्त इतके करेक्शन करून बँकेत चेक  पाठवुन द्या.*

*असे म्हणून त्यांनी एका विशिष्ट* *शब्दावर लाल पेनने एक सर्कल केला व काही न बोलता स्टेटमेंट दोघांना परत केले .*

*दोघांनीही लाल सर्कल कडे बघितले .. .”एरिअर्स” च्या ठिकाणी “अफेअर्स’ असे नजर चुकीने टाइप झाले होते* .   *स्टेटमेंट ऑफ “अफेअर्स ” ऑफ क्लास वन ऑफिसर्स”.आणि खाली अमाऊंट , पेमेंट इ.* . *अग्ग बाई ग ..चुकलेच माझे* .. 🤭 *असे म्हणून दोघेही लाजुन केबिन बाहेर जायला लागले. अरे काय मॅडम, तुम्ही सर्व साहेबांचे अफेअर्स आल्या आल्या काढले? मला सर्व  माहीत असूनही  मी आतापर्यंत  नाही काढले?*   *सर, पण माझी चूक झाली मान्य करते पण तुम्ही तर चेक केले होते ना? .. झाले.. एक नवीनच भांडण उदयाला  येत होते .🏾🏽 एका नजर चुकीने स्टेटमेंटचे सारे संदर्भच बदलून गेले होते.  मॅडमने घामाघूम होऊन  डोक्यावर हात मारला..!*  *आणि शाखा प्रबंधक मात्र गालातल्या गालात हसत दोघांच्या “एका नजर चुकी”ची मजा घेत होते.!*

*असे किस्से अशी गम्मत ..स्वभावाची वेगळीच जम्मत..! *श्रीकांत पवनीकर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.