गडचिरोली पोलिसांची दारूभट्टीवर धाड

गडचिरोली : पोळा सणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वाहनाद्वारे मोठय़ा प्रमाणात दारू तस्करी करण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी तपासणी नाक्यावर वाहनाची तपासणी सुरू केली आहे. गडचिरोली पोलिसांच्या वतीने विविध वार्डातील शराब विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वेगवेगळे पथक तयार केले आहे. पोळा सणाच्या दोन दिवसापूर्वी रानमुल जंगल परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी धाड टाकून दारूभट्टी नष्ट केली.
गडचिरोली ठाण्यांतर्गत येत असतेल्या रानमुल जंगल परिसरात अवैधरित्या मोहाफुलाची दारूभट्टी सुरू असल्याचे गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी माहितीच्या आधार सदर जंगल परिसरात धाड टाकून ३ लाख ५५ हजार ५00 मुद्देमाल व गडचिरोली शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून ३0 हजारांची मोहफुलाची दारू असा एकूण ३ लाख ९३ हजार ५00 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रमेश मरस्कोल्हे, जेदराम मरस्कोले, हेमराज सुरपाम, दुषांत मरस्कोल्हे, अरूण मलगाम सर्व रा. रानमुले यांच्या विरोधात गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिस ठाण्यात नव्याने रूजू झालेल्या ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्या विरोधात धाड सत्र सुरू केले आहे. दरम्यान तालुक्यातील रानमुले जंगल परिसरातील अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांन सदर जंगल परिसरात धाड टाकून ३ लाख ५५ हजार ५00 रूपयांच्या दारूसह मोहसडवा जप्त केला. याप्रकरणी ५ अवैध दारू विक्रेत्यावर विरोधात गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई शहरातील रामनगर येथील कांताबाई मोहुर्ले या दारूविक्रेतीच्या घरी धाड टाकून २४ हजाराची दारू जप्त केली. तिसरी कारवाई तालुक्यातील मुरखळा येथील कविता गगनोनी हिच्या घरी धाड टाकून १४ हजारांचा माल जप्त केला. असा एकूण ३ लाख ९३ हजार ५00 रूपायांचा मुद्देमाल जप्त केला.
सोमवार, मंगळवार दोन दिवस पोळा सण साजरा करण्यात येता. या पार्श्‍वभुमीवर दारूची तस्करी व दारू फिन फिरणार्‍याची संख्या वाढयाची शक्यता आहे. ही बाब लक्षात गडचिरोली पोलिसांच्यावतीने दारू तस्करी व विक्रीवर आळा घाण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.