गडचिरोली : धावत्या एसटीचे निघाले चाक, दैव बलवत्तर म्हणून वाचले 40 प्रवाशांचे प्राण

गडचिरोली, 6 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या धावत्या बसचे अचानक चाक निघाल्याने आज दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास मोठा अपघात होता होता वाचला.दैव बलवत्तर असल्याने कोणत्याही प्रवाशांना ईजा झाली नसली तरी या घटनेवरून एसटी महामंडळाचे प्रवासी बसच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळी 11 वाजता च्या सुमारास ब्रह्मपुरी आगाराची सिरोंचा -गडचिरोली बस क्रमांक. एमएच 40एक्यू 6199 सिरोंचा वरून निघाली .दरम्यान गडचिरोली नजीक असलेल्या गोविंदपूर नाल्याच्या समोर चालत्या बसचे मागील बाजूचे चाक ड्रम सहित निघाले सोबतच दुसऱ्या बाजूचे चाक ही रॉड मधून निघून ढिले झाले होते. त्यामुळे बस पलटी खाता खाता वाचली.या बस मध्ये 40 च्या वर प्रवासी प्रवास करत होते.पोळ्याच्या दिवस असल्याने आज प्रवाशांची चांगली गर्दी होती मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

या घटने वरून एसटी महामंडळाचे बस गाडांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. आधीच गडचिरोली विभागात भंगार बस गाड्यांची भर मार आहे त्यामुळे अश्या घटना होत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.