गडचिरोली – बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा

गडचिरोली ४ सप्टेंबर : मुलचेरा तालुक्यातील लगाम गावानजीक असलेल्या येल्ला या गावातील मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे . बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव मुत्ता रामा टेकूलवार वय ५५ असे आहे . टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला शेतातील विहिरीत उतरले होते. शेताला लागूनच जंगल आहे. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा. रात्रभर ते घरी परत न आल्याने पत्नीने सकाळी गावकऱ्यांसोबत शोधाशोध सुरू केली. शेतात टेकुलवार यांचे शीर आणि धड वेगळे झालेला मृतदेह आणि बिबट्या त्याच्याजवळ लचके तोडत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.