गडचिरोली : दारूसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकानंदनगर येथे काल रात्रीच्या सुमारास सापळा रचून १ लाख ९७ हजारा रूपये किंमती देशी -विदेशी दारू व दारूतस्करीसाठी वापरण्यात आलेले १ लाख ५0 रूपये किंमतचे चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात अवैधरित्या दारू तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशान्वये पथकाने गडचिरोली शहरातील विवेकानंद नगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास सापळा रचला असता एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळून आले. पोलिसांनी सदर वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालका पोलिस असल्याचा संशय आल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेऊ पसार झाला. चालकाचा पाठलाग केला परंत तो मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ९३ हजार रूपये किंमतीची इम्पेरीयल ब्यु सुपेरीयर विस्की कंपनीचे ३१0 बॉटला, ५६ हजार रूपये किंमतीची सुपर सॉनिक राकेट संत्रा कंनीचे ७ बॉक्स, ४८ हजार रूपये किंमतीच्या देशी दारूचे ६ बॉक्स आढळून आले, पोलिसांनी १ लाख ९७ हजारांची देशी-विदेशी दारू व दारूतस्करीसाठी वापरण्यात आलेले १ लाख ५0 हजार रूपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अ.पक्र. ५६१/ २0२0 कलम ६५ (अ) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार वाहनचालकाचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार दादाजी करकाडे, पोलिस शिपाई सुनिल पुट्ठावार, पोलिस शिपाई मंगेश राऊत, महिला नायक पोलिस शिपाई पुष्पा कन्नाके, चानापोशि शेषराज नैताम, चापोशि सिद्देश्‍वर बाबर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.