जुगार अड्ड्यावर धाड, 13 जणांना अटक, 4535 रूपयांचा माल जप्त

तिरोडा, दि.7 : अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम तिरोडा पोलिसांनी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत 5 व 6 सप्टेंबर रोजी दोन जुगार अड्ड्यांवर छापेमार कारवाई करण्यात आली. यात तब्बल 13 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याजवळून 4535 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.पोळा सणाच्या दिवशी ग्रामीण भागात तास पत्त्यावर जुगार खेळले जाते. या माहितीवरून  पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केलेली आहे.

त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून रविवार, 5 सप्टेंबर रोजी साई मंदिराच्या बाजूला लोधीटोला तिरोडा येथे जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. यात उमेश ओंकार लिल्हारे, वडगु शोभेलाल अटराये, ईश्वर बाबुलाल दुधमोरे, राजेश जोसीलाल तिवडे, शुभम टेकचंद लिल्हारे व पतिराम हिरापुरे सर्व रा. लोधीटोला तिरोडा हे तासपत्त्यावर जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या जवळून 52 तासपत्ते आणि नगदी 1025 रुपये जप्त करण्यात आले.

तसेच सोमवार, 6 सप्टेंबर रोजी रात्रीला ग्राम चिरेखनी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालण्यात आला. त्यामध्ये विजय खेमलाल रिनाईत, अमित दुलीचंद पारधी, लखन गोपीचंद पारधी, राजन दुलीचंद पारधी, युगल रमेश पारधी, अनिल शंकर नेवारे, गणेश प्रेमलाल रहांगडाले व छत्रपती राधेश्याम रहांगडाले सर्व रा. चिरेखनी हे तासपत्तीवर जुगार खेळताना मिळून आले. त्याच्या जवळून  नगदी 1225 रुपये व 4 मोबाईल हँडसेट असा एकूण 3510 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर विशेष मोहीम सतत सुरु राहणार आहे, असे तिरोडा पोलिसांच्या वतीने कळविण्यात आले आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत सहायक पोलीस निरीक्षक हनवते, जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, नायक पोलीस शिपाई मुकेश थेर, मेश्राम,  रक्षे, बर्वे, वाडे, पोलीस शिपाई लांडगे, अंबादे, शेख यांनी केलेली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.