धान्य घोटाळ्यात नागपूर ईडीकडून घोरपडेंना अटक

Share This News

नागपूर : रेशन धान्य अपहारप्रकरणी नाशिक येथील घोरपडे बंधूंना सक्तवसुली संचालनालय (ईडी) नागपूरच्या पथकाने अटक केली आहे. एकूण १७७ कोटींचा हा घोटाळा अरहे. संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
सुरगणा, सिन्नर, इगतपुरी, घोटी येथे मागील काही वर्षांत झालेल्या रेशन धान्य घोटाळ्यांपैकी काही घोटाळ्यांमध्ये घोरपडे बंधूंचे नाव पुढे आले आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र तयार करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीच्या नागपूर चमूने कारवाई केली आहे. घोरपडे बंधूंविरुद्ध २०१५ मध्ये प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. रेशन माफियांविरुद्ध मकोका लावण्याची ती राज्यातील पहिली घटना म्हणून सहा वर्षांपूर्वी नोंद झाली होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.