चंद्रपूर : जीएमआरने पटकावला नॅशनल लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च बहुमान

चंद्रपूर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) व गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटरच्यावतीने (जीबीसी) आयोजित २२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग चौथ्यांदा उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार्‍या जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडला यावर्षीही ऊर्जा व्यवस्थापनेत नॅशनल लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
२७ ऑगस्ट २0२१ रोजी सीसीआयने आयोजित केलेल्या व्हच्यरुअल इव्हेंट दरम्यान सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो बीईईचे संचालक सुनील खंडारे आणि ऊर्जा परिषदेचे अध्यक्ष रविचंद्रन पुरुषोत्तम व सीआयआय डॅनफॉस इंडियाचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील संस्थांनी ऊर्जा व्यवस्थापन आणि उत्कृष्ट नियोजन कामगिरी व ऊर्जा व्यवस्थापन करणा?्या कंपनीस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ऊर्जा व्यवस्थापनेद्वारे ऊजेर्ची बचत, उत्कृष्ट नियोजन व ऊर्जा क्षेत्रातीत उच्च तंत्रज्ञानाचा वापर हे या पुरस्कार देण्यामागचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार निवडण्याचे दोन स्तर असतात.
पहिल्या स्तरावर प्रश्नावलीला सामोरे जाणे आणि दुसर्‍या स्तरात राष्ट्रीय निष्णात ज्युरीसमोर प्रत्यक्ष केलेल्या कायार्चे सादरीकरण, असे या निवडीचे स्वरुप असते. एखाद्या कंपनीची सुरुवातीच्या स्क्रीनिंग प्रक्रियेत निवड झाली की, तिला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कारामध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळते. ऊर्जा प्रकल्प श्रेणीतील भाग घेतलेल्या ४0 हून अधिक कंपन्यांपैकी ४ कंपन्यांची अंतिम फेरीच्या सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती.
जीएमआरने आपल्या प्रक्रियांमध्ये ऊर्जा वापर कमी करण्यासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. त्यात जीएमआरला हा बहुमान मिळाला.
हा पुरस्कार सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे भान असणार्‍या सदर समुहाच्या दृष्टीकोनाची साक्ष असून गुणवत्ता, पर्यावरण, ऑपरेशन परफॉर्मन्स आणि कार्यक्षमतेच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जागतिक दर्जाची कंपनी बनण्याचे आमचे ध्येय आम्ही साध्य करू, असा विश्‍वास जीएमआर प्लांट प्रमुख धनंजय देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.