गोंदिया : भाजपने दिला इशारा वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन

गोंदिया : कोरोना काळात लोकांचे रोजगार, व्यवसाय बंद पडले होते. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी वीज विभागातर्फे अवाढव्य वाढीव वीज बिल पाठविण्यात आले. आता बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची नोटीस सर्वसामान्य ग्राहकांना पाठविण्यात येत आहे. सर्वप्रथम ही नोटीस पाठविणे त्वरित थांबण्यिात यावे व वीज बिल कमी करण्यात यावे. तसेच कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यास भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय जनता पक्षा गोंदिया शहरच्या वतीने देण्यात आला. याबाबत बुधवारी (दि. २७) उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ऊर्जामंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात निवेदन देताना शंभुशरणसिंह ठाकूर, अमित झा, संजय मुरकुटे, सुरेश चंदणकर, नरेंद्र तुरकर, अशोक जयसिंघाणी, योगेंद्रसिंह सोलंकी, धर्मेंद्र डोहरे, सतीश मेश्राम, बबली ठाकूर, ऋतुराज मिश्रा, पारस पुरोहित, संदीप श्रीवास, बंटी शर्मा, अर्पीत पांडे, मिलिंद बागळे, नितीन भदाडे, राकेश मित्तल, जसपाल चावला, पलास लालवानी, प्रतीक तिवारी, गुड्डू चांदवानी, सुशील राऊत, ऋषभ शिवहरे, अनुज लांजेवार, लखन कडव, सचिन तिडके, किशोर चौधरी, भाऊलाल तरोणे, राहुल भालमे, हिमांशू अग्रवाल, ईश्वर पारधी, महेंद्र ऊइके, मंगलेश गिरी, रामेश्वर लिल्हारे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.