गोंदिया ग्रामीणच्या पोलिस निरीक्षकास अटक

गोंदिया : हद्दपारीच्या आदेशांच्या बाबतीत पोलिस हवालदाराच्या मध्यस्थीने लाच घेणाऱ्या गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस हवालदार रामसिंह बैस याने तक्रारदार माजी सैनिक उत्तमचंद मोहन खांडेकर (वय ५०, रा. तांडा, जि. गोंदिया) यांच्याविरुद्ध पारित झालेले हद्दपारीच्या आदेशात त्यांना मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली होती. यातील पाच हजार आपले व दहा हजार तत्कालीन पोलिस निरीक्षकाचे असल्याचे त्याने खांडेकर यांना सांगितले होते. लाचेची रक्कम बैस याने स्वीकारली होती. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान धारबळे यांनी बैस याला लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धारबळे यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार व मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, पोलिस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, नाईक पोलिस शिपाई रंजितकुमार बिसेन, दिगंबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.