गोंदिया : मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी

Share This News

गोंदिया
जन्म झाले तर मृत्यू होईलच. मृत्यू हे जीवनाचे वास्तव आहे. मात्र, अवेळी होणारे निधन हे अत्यंत त्रासदायक असते. घरी लहान-लहान निष्पाप मुली आणि अशात त्यांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरविणे, या कल्पनेनेच अंगावर काटे उभे राहतात. परंतु अशीच एक घटना गोंदिया शहरातील परमात्मा नगरात घडली आहे.
परमात्मा नगरच्या छत्रपती कॉलनी येथील रहिवासी कृष्णा बोडणे (वय ४४) यांचे २0 जानेवारीच्या रात्री अकस्मात निधन झाले. अशा स्थितीत बोडणे कुटुंबावर जणू आकाशाची कुर्‍हाड कोसळली. कृष्णा पाणीपुरीचा व्यवसाय करून कसेतरी आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करीत होते. अचानक प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. गुरुवार, २१ जानेवारीच्या दुपारी बांध तलाव मोक्षधामावर अंतिम संस्कार करण्यात आले. कृष्णा यांना मुलगा नाही. त्यामुळे अंतिम संस्कारात ८ वर्षीय व १0 वर्षीय मुलींना सहभागी करण्यात आले. दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिली. हे दृश्य बघून तेथे उपस्थित अनेक लोकांच्या डोळ्यांनी अर्शुला वाट मोकळी करून दिली. कृष्णाच्या कुटुंबात पत्नी व दोन मुलींचा समावेश आहे. त्याच्या भावाचे कुटुंब वेगळे राहत असून मृतकाच्या मागे वृद्ध आई सुद्धा आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.