मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार गोंदिया तंबाखूमुक्त

मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी ९ निकस निर्गमित केलेली आहे. त्यानुसार आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया, सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या वतीने या ९ निकषांची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे.
संपुर्ण गोंदिया जिल्हा तंबाखूमुक्त शाळा बनविण्याकरिता जानेवारी २0२१ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, तंत्र स्नेही शिक्षक, मास्टर ट्रेनर यांची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वेबिनार घेण्याचे आयोजन जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया, सलाम मुंबई फाऊंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांचे मार्फत घेण्यात येणार आहे. सदर वेबिनार मध्ये शैक्षणिक संस्थांच्या आवारात ६ सें.मी. ४५ सें. मी. आकाराचा तंबाखूमक्त परिसरचा फलक असावा त्या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक याचा उल्लेख असावा, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रवेशद्वाराच्या सीमेवर संस्थेच्या बाह्यभिंतीवर ६0 सें.मी.४५ से.मी. आकाराचा फलक असावा, शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये, तंबाखूचे दुष्परिणाम यावर आधारित पोस्टर्स किंवा तंबाखूचे दुष्परिणामवर आधारित साहित्य शाळेत प्रदर्शित केलेले असावे, शैक्षणिक संस्थेत गेल्या सहा महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रण आधारित उपक्रम राबवणे, शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू मॉनिटर्स म्हणून कर्मचार्‍यांना मधून अधिकारी किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधी मधील नेमणूक केली पाहिजे आणि मॉनिटर्स पद आणि संपर्क नंबर नमूद केले जावेत, तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचारसंहिता मध्ये समाविष्ट केले गेले पाहिजे, शैक्षणिक संस्थेच्या बाह्यभिंतीवर १00 यार्ड क्षेत्र रेखांकित केले गेले पाहिजे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १00 यार्डात नसावे, अशाप्रकारे ९ निकषांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते पुरावे तयार करावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.