आनंदवार्ता ! गडकरींकडून ‘नागपूर मेट्रो-थ्री’ची घोषणा

Share This News

नागपूर : नागपूर मेट्रोच्या दोन टप्प्यांचे काम यशस्वीपणे पूर्णत्वास आल्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘नागपूर मेट्रो फेज थ्री’ची घोषणा केली आहे. महामेट्रोने तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवेचा नकाशा तयार केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो संत्रानगरीत गोलाकार पद्धतीने फिरणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. त्यानुसार नागपूर मेट्रोचा विस्तारीत प्रकल्प तयार करण्यात आला आहे. ४४ किलोमीटरच्या नव्या टप्प्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाला पाच वर्षे लागणार आहे. एमआयडीसी आणि एमएडीसीही यात भागीदार असेल. तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो टायरवर चालणारी राहणार आहे. यासाठी आधीच्या टप्प्यांपेक्षा कमी खर्च होणार आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मेट्रोसाठी प्रति किलोमीटरमागे ७५ कोटी रुपये लागणार आहे. सध्याच्या एलिव्हेटेड मेट्रो रेल्वेचा एक किलोमीटरचा खर्च २२० कोटी रुपये आहे. भूमिगत मेट्रोचा खर्च ४०० कोटी रुपये येतो.

असा असेल तिसरा टप्पा
नव्या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो वासुदेवनगरातून सुरू होईल. ती वाडी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापतीनगर, शिवाजी चौक मार्गे पुन्हा वासुदेवनगराला जोडली जाईल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.