गोरेवाडा उद्घाटनासाठी सज्ज झाले

६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रस्तावित उद्यानाचे नामकरण होणार असून, इंडियन सफारीचेही उद्घाटन होणार आहे. इंडियन सफारीसाठी ११५ हेक्टर परिसरात उभारलेल्या चार एन्क्लोजरमध्ये प्राणी सोडण्यात आले असून, तेथील काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुपारी ३ वाजता काटोल मार्गावरील या प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड असतील. केंद्रीय रस्ते परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी आणि नामकरणासाठी सज्ज झाले असून, ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान‘ असा फलकही झळकला आहे. या नामकरणाला असलेला विरोध लक्षात घेता, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांची तुकडी आतापासूनच प्राणी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर तैनात झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.