गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करणार, गडकरी-जयंत पाटील-फडणवीसांची दिल्लीत बैठक

Share This News

राज्यातील सिंचन प्रकल्पाविषयी दिल्लीत आज मह्तवपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन  गडकरी यांनी ही आढावा बैठक घेतली.या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत,महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी,आयुक्त  राधाकृष्ण बी. भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुनरुज्जीवन,नागपुरातील नाग नदीचे पुनरुज्जीवन,गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेतील २६ प्रकल्प,बळीराजा जलसंजीवनी योजनेतील विशेष पॅकेजच्या ९१ प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या सर्व प्रकल्पामंधील अडचणी सोडवून प्रकल्पांना गती देण्याची चर्चा यावेळी या बैठकीत झाली. नागपुरच्या नागनदीतून बोटीतून प्रवास करण्याचे स्वप्न असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  दिवसांपूर्वी जाहीर सभेत बोलून दाखवले होते. तसेच नाग नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटी मंजूर झाल्याची माहितीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती या अनुषंगाने दिल्लीत आज ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.