सरकारने शेतकर्‍यांना उपाशी मारू नये : राजाभाऊ खोब्रागडे

केंद्र सरकारने शेतकर्‍यांना उपाशी मारू नये. केंद्र सरकारने हेकेखोरपणा सोडुन न्याय द्यावा. शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष, संघटना एकत्रित झाल्यास देशात गृहयुद्धाची स्थिती निर्माण होईल. शेतकर्‍यांसोबत देशातील १३0 कोटी जनता भुकेने मेल्याशिवाय राहणार नाही आणि याचे दोषी केंद्र सरकार राहील, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बॅ. राजाभाऊ खोब्रागडे)चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग यांनी व्यक्त केले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गांधी विचार मंचचे प्रा. विजय बारसे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जनआंदोलन करण्यात आले.
प्रेमदास चाहांदे यांना न्याय द्यावा, गोधणी येथील सिमेंट रस्ते व पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम त्वरित करा, विद्यार्थी व पालकांना शिक्षणसंस्था पैशाकरिता त्रास देणार्‍या प्रमुखांना त्वरित अटक करा आदी मागण्या या जनआंदोलनात करण्यात आल्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला आरंभ करण्यात आला. आंदोलनात काँग्रेस, बिआरएसपी, एसएसडी, रिपाइं गटाचे व सत्यशोधक समाज या विभिन्न संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या सर्मथनार्थ भारत बंदच्या आंदोलनाला आपली उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी विरेंद्र दहीकर, मोरध्वज अढाऊ, प्रकाश कुंभे, अशपाख खान, धर्मेश पाटील, संदीप कासे, जितू कुर्वेकर, किशोर महुखाये, विलास पाखंडे, डी. डी. मेर्शाम, सी. डी. वाघमारे, राहुल सोमकुंवर, राकेश अंतोनी, अमित शिंदे, तनविर अहमद, उमेश देशमुख, दिलीप मुनेश्‍वर, सुरेश तिवारी, बंडू जंगले आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.