चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास होणार सुरुवात, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळणार अवघे पाच दिवस

चंद्रपूर 23 डिसेंबर – राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस मिळत आहे. ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मात्र या निवडणूकीची नामनिर्देश पत्र प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन स्वरूपात राहणार आहे.
 नामनिर्देश पत्र, घोषणा पत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र व लागणारी इतर माहिती वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना स्वतःची नोंदणी करून माहिती भरावी लागणार आहे. यासाठी निवडणुका असलेल्या जिल्ह्यात सेतू, ई सेवा केंद्र, संग्राम कक्ष इत्यादी जास्त क्षमतेची इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी तसेच सायबर कॅफे अन्य सुविधा केंद्रांवर नामनिर्देशन पत्र भरण्याची सोय उपलब्ध राहणार आहे. त्या भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे. ३० डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे मात्र २५ ते २७ या काळात सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस मिळणार आहेत. दरम्यान नव्या वर्षात ग्रामीण भागातील राजकारण थंडीत जोरदार तापणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.