अनोख्या शब्दात आणि त्याच्याच स्टाईल मध्ये आठवले यांना वाढदिवसाचा शुभेच्छा

आपल्या कवितांमुळे कायम चर्चेत असलेले नेते म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले. आज रामदास आठवले यांचा 62 वा वाढदिवस. या वाढदिवसाचे निमित्त साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले यांना ट्विटरवर काव्यमय शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या चारोळ्या व कवितांमुळे रामदास आठवले अनेकदा चर्चेत असतात. अशात गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आठवले यांच्याच स्टाईल मध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीचा उल्लेख व समर्थनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सोशल मीडियामध्ये चागलेच व्हायरल झाले आहे

“बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग”

आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.