अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अमरावती, 7 सप्टेंबर विदर्भात अनेक जिल्ह्यांत रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह दमदार पावसानेहजेरी लावली. अमरावतीत रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत कायम होती.

जिल्ह्यातील भातकुली येथील पेढी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आज सकाळी अमरावती ते भातकुली या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. सुरक्षेच्यादृष्टीने भातकुली पोलिस येथे तैनात होते.बडनेरा नवीन वस्तीत यवतमाळ रोडवर झिरीसमोरचा मोठा पूल ओलांडताच डाव्या बाजूला असलेल्या सुमारे 25 घरांमध्ये कंबरेएवढे पाणी शिरले. पहाटे तीन वाजतापासून हाहाकार माजला होता. महापौर चेतन गावंडे ,नगरसेवक सुधार भारतीय यांनीही या भागाला भेट देऊन फणी केली मनपाचे उपायुक्त पवार व रेस्क्यू पथक तात्काळ पोहोचले. सकाळी 6 पर्यंत पाण्याचा निचरा करण्यास यश आलेले नव्हते मोठ्या प्रमाणात साप देखील वाहून आल्याने व घरात शिरल्याने लोक घाबरले होते. तसेच जिल्ह्यातील अनेक भागात देखील पावसाचा जोर कायम असून खोलगट भागात पाणी शिरले आहे.दरम्यान, विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह रात्रापासून मुसळधार पाऊस कोसळला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.