देवरी तालुक्यातील शेकडो रेशन कार्डधारक रेशनपासून वंचीत

देवरी तालुका नक्षलग्रस्त भागात मोडत असून या तालुक्यातील लोकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागातील हजारो लोक रोजगाराकरीता शहरी भागाकडे जातात. कोरोना संकटामुळे या लोकांचे रोजगारही हिसकावण्यात आल्याने रोजगाराकरीता गेलेले हजारो लोक आपल्या गावाकडे परतले.पंरतु ऊदरनिर्वाहाचा प्रश्न त्याचांसमोर सतत पडत असल्याने फक्त शासनाकडून मिळणार्या मासिक राशनवरच त्यांना आपला महीना चालविण्याची वेळ आली.परंतु चिचगड भागी या गावातील सुमारे ३० ते ३५ लोकांचे राशन कार्ड अनेक वर्षापासुन तयार असूनही अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या राशन कार्डधारकांना रेशनच्या धान्यापासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे.रेशनकार्ड असून रेशन मिळत नसल्याने चिचगड भागी,सुकळी,सुंदरी,कडीकस्सा, अंभोरा य़ा गावातील शेकडो लोक अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे रेशनपासुन वंचीत राहिले आहेत.

माहितीचे दर्शनी फलकच नाही
प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांसमोर स्वस्त धान्य दर दर्शविणारा दरफलक असला पाहिजे. मात्र स्वस्त धान्य वितरक व पुरवठा अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने दुकानदार नियम धाब्यावर बसवित आहेत.
आपल्या दुकानात शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या, दुकानदाराचे नाव व त्याचा पत्ता आणि फोन नंबर, दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ हे सर्व त्यावर नमूद असावे लागते. याशिवाय लोकांच्या रेशन संदर्भात अडचणी असल्यास तक्रार पुस्तिका, रेशन संदर्भात हेल्पलाईनचे फोन नंबर, लोकांना वेळीच माहिती हवी असेल किंवा तक्रार करावयाची असेल तर पुरवठा निरीक्षक, तहसीलदार, आदी अधिकारी वर्गाचे फोन नंबर असणे महत्त्वाचे आहे. तशी शासन नियमावली असूनही कुणी राशन दुकानदार अस्या माहीती फलकाचा ऊपयोग करीतच नाही . याचे कारण असे आहे की, तक्रार केल्यास पुरवठा अधिकारी वर्ग त्या तक्रारकर्त्यासच पोलिस कारवाईची धमकी देऊन गप्प बसवल्या जाते. सर्व ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित होऊनही देवरी तालुक्याच्या स्वस्त धान्य दुकानादारांच्या व अधिकार्‍यांच्या खाऊ वृत्तीत काहीच बदल नसल्याचे दिसते.

चिचगड राष्ट्रवादी महीला कांग्रेस सदस्याची तक्रार
चिचगड क्षेत्र परिसरातील जवळपास सर्व दुकानदारांकडे दरफलक नाही. खरेदी केलेल्या मालाची पावती न देणे, तसेच ठराविक वेळेत दुकान उघडे न ठेवता मर्जीने दुकान उघडणे, इत्यादी तक्रारी सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक करीत आहेत. या क्षेत्रातील पुरवठा विभागाने तर कहरच केल्याचे दिसते. काहींना आरसी नंबर नाही तर काहींना आरसी नंबर असून धान्य न देण्याचा चंगच बांधला असल्याचे दिसते. शेकडो राशन कार्ड वर्षापासुन बनुनही राशन लाभापासुन वंचीत आहेत. एकंदरीत बराच सावळा गोंधळ देवरी तालुक्यातील अनेक भागात असून, या सर्व तक्रारींच्या माहितीचे निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महीला कार्यकर्ता आरती जांगळे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.