पासपोर्ट मी स्वतः जमा केला- विजय वडेट्टीवारांनी

आजच्या तारखेत माझ्यावर एकही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल नसून माझ्या बदनामीचा विरोधक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केल्याची बातमी समोर आल्यावर त्यांच्याकडील पासपोर्ट हा जप्त केला नसून त्यांनी स्वतः तो ईडी कार्यालयात २१ डिसेम्बरला जमा केल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत वङेट्टीवर म्हणाले कि २०१२ साली त्यांचा पासपोर्ट काढण्यात आला होता,त्यावेळी त्यांच्यावर किरकोळ स्वरूपाचे चार गुन्हे दाखल होते. परंतु पासपोर्ट काढताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागत नसल्याने या गुन्ह्याविषयीची माहिती त्यांनी दिली नाही. आता भाजप आमदार भांगडिया यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यावर नोटीस आली व त्या नोटिसीचेही त्यांनी उत्तर दिले आहे. पोलिसांच्या विशेष शाखेकडून त्यांच्यावर आता कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचं प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे. विरोधक केवळ सुतळीच्या साप करीत असल्याचंही आरोप वडेट्टीवारांनी यावेळी केला. मी समोर जाऊ नये व माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही आरोप विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.