नटसम्राट व्हायचे असेल तर मोदींनी सिनेमात जावं – नाना पटोले

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नटसम्राट यांचेशी केली आहे.   ‘मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही,त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नाना पटोले आज पहिल्यांदा नागपुरात आले,विमानतळावर जंगी स्वागत झाल्यावर पटोले यांनी दीक्षाभूमी येथे अभिवादन केले,यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंगळवारी नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत असताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. याच घटनेवर बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.