अमरावती : बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री If rumors about bird flu are spread, cases will be filed

Share This News

अमरावती, २९ जानेवारी : अंडी व चिकन हा प्रथिनसंपृक्त आहार आहे. ते पूर्णपणे उकडून खाणे सुरक्षित असून, बर्ड फ्लूबाबत गैरसमज निर्माण करणा-या अफवा कुणी पसरवल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. अमरावती पोल्ट्री फार्म असोसिएशनतर्फे दस्तुरनगरातील गुणवंत हॉलमध्ये आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

चिकन- अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. शरीराला प्रथिनांची गरज असते. संसर्गाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे अंडी या आहाराचा पोषण आहार योजनेतदेखील शासनाने समावेश केला आहे. या उत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नाबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नयेत.अफवांमुळे पोल्ट्रीधारक बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मी पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याबाबत पाठपुरावा करून निश्चित तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्रीधारकांचे नुकसान होते. व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोनाकाळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाल्या.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.