रेशनकार्डला “आधार” लिंक नसल्यास 1 फेब्रुवारीपासून रेशन बंद होणार If there is no “Aadhaar” link on the ration card, the ration will be closed from February 1

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण व कुटूंबातील किमान 1 व्यक्तीचा मोबाईल नोंदणी करण्याच्या सुचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. यासाठी शासनाने 31 जानेवारी 2021 ची मुदत दिलेली आहे. अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.

31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन रेशनकार्डवर आधार सिडींग न केल्यास 1 फेब्रुवारीपासून रेशन बंद करणेत येणार आहे. रेशनकार्डवर ऑनलाईन आधार सिडींग व मोबाईल क्रमांकाची नोंद सर्व रास्तभाव दुकानदार यांचेकडील पॉज मशीनवरच करता येणार आहे. यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड घेवून रास्तभाव दुकानदारांकडे स्वत: जाणे आवश्यक आहे. जे लाभार्थी आधार क्रमांक संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे जमा करणार नाहीत. त्यांना अन्नधान्य देण्यात येणार नाही. याची नोंद सर्व शिधापत्रीका धारकांनी घ्यावी. असे आवाहन तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.