गेल्या २४ तासांत २४ हजार ९00 जण कोरोनामुक्त, २५२ मृत्यू

नवी दिल्ली
देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या २४ तासात भारतामध्ये २४ हजार ९00 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १६ हजार ४३२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी २ लाख २४ हजार ३0३ वर पोहचली.

भारतात सध्या २ लाख ६८ हजार ५८१ अँक्टिव्ह केसस आहेत. आतापर्यंत ९८ लाख ७ हजार ५६९ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर, १ लाख ४८ हजार १५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात २८ डिसेंबरपयर्ंत १६ कोटी, ९८ लाख, १ हजार ७४९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. ज्यापैकी ९ लाख ८३ हजार ६९५ नमुने सोमवारी तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली. कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाने डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापयर्ंत १६ देशांत पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.