गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन Inauguration of Indian Safari at Gorewada International Zoo

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २.४५ वाजता विमानाने आगमन झाले. आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर  इंडियन सफारीचा अनुभव घेतला.समारंभात उद्धव ठाकरे म्हणाले,आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही.नागपुरातील या प्राणी संग्रहालया एवढा देशात एकही झू नसावा. नागपुरात सिंगापूरच्या धर्तीवर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे. गडचिरोलीतील सुरजागडचा प्रकल्प देखील लवकरच मार्गी लावायचा आहे.या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुवून काढायचा आहे.नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण १ मे रोजी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.नामकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून ते म्हणाले, या नामकरणाच्या प्रसंगी कुणीही नाराज होण्याची किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही.  या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल.

एक संघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना यापुढे विदर्भाकडे दुर्लक्ष होणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल आणि या संस्कृतीचे दर्शन जागतिक पर्यटकांना करून दिले जाणार असल्याचे सांगितले. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे आमदार आशीष जयस्वाल, आमदार अभिजित वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर,  आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष  रश्मी बर्वे,  माजी आमदार प्रकाश गजभिये,  वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद मैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन  प्रमुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.