भारताने श्रीलंकेला दिली ‘संजीवनी’; कोरोना लशीचे 5 लाख डोस मोफत

Share This News

कोलंबो 29 जानेवारी: श्रीलंकेला भारताकडून कोरोना वॅक्सीन (Corona Vaccine) मिळाल्यानंतर शुक्रवारी कोलंबोच्या (Colombo) आसपास असणाऱ्या 6 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला प्रारंभ झाला. याअंतर्गत सर्वात आधी आरोग्य कर्मचारी, सेनेतील जवान आणि सुरक्षा रक्षकांना ही लस देण्यात आली. भारतानं श्रीलंकेला कोरोना लसीकरणाचे 5 लाख डोस मोफत दिले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) ही लस पोहोचल्यानंतर स्वतः विमानतळावर गेले होते. त्यांनी कोविशील्ड वॅक्सिनसाठी भारताचे आभारही मानले.

भारताने मागच्याच आठवड्यात घोषणा केली होती, की भारताकडून भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स, अफगानिस्तान आणि मॉरीशस यांना मदत म्हणून कोरोना लसीकरणाचे डोस दिले जातील. भारताकडून आतापर्यंत शेजारी असलेल्या नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीवला हे डोस पोहोचण्यात आले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.