कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला

Share This News

नवी दिल्ली – देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,95,278 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,346 नवे रुग्ण आढळून आले असून 222 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,50,336 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाबतची सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील एक कोटींहून अधिक लोकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई जिंकली आहे.  कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात भारी असून देशाचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 44 पटींनी जास्त आहे. सध्या देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 2,28,083 इतके आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण 51 टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा मृत्युदर 1.45 टक्के आहे. 6 जानेवारी 2021 पर्यंत संपूर्ण देशभरातून 17 कोटी 84 लाख 995 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. यापूर्वी 58 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी यात नव्या 13 रुग्णांची भर पडून एकूण आकडा 71 झाला आहे.  या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम आयसोलेशन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.