लसीकरणात भारताने जी-७ ला टाकले मागे

नवी दिल्ली
भारतातील लसीकरणाचा वेग जी-७ राष्ट्रांपेक्षाही अधिक असल्याचे समोर आले आहे. जी-७ राष्ट्रांच्या एकूण लसीकरणापेक्षाही जास्त लसीकरण भारतात फक्त ऑगस्ट महिन्यात झाले असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. भारतातील लसीकरण मोहिमेत ऑगस्टमध्ये १८0 दशलक्षांहून अधिक डोस दिले गेले. ही संख्या कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, इटली, र्जमनी, फ्रान्स आणि जपानचा समावेश असलेल्या सात राष्ट्रांच्या सर्व गटांपेक्षा अधिक आहे. माय गव्हर्नमेन्ट इंडियाने ट्विट केलेल्या आकडेवारीनुसार, कॅनडाने जी-७ राष्ट्रांमध्ये अनुक्रमे, सर्वात कमी आणि सर्वोच्च श्रेणीमध्ये तीन दशलक्ष डोस आणि जपानने ४0 दशलक्ष डोस दिले. अजून एक कामगिरी! ऑगस्ट महिन्यात १८0 दशलक्षांहून अधिक लसीचे डोस दिल्याने, भारत आपल्या लोकसंख्येला प्राधान्याने लसी देण्यात जागतिक पातळीवर सर्वात पुढे, अशा आशयाचे ट्विट करण्यात आले आहे.
देशात आतापयर्ंत कोरोना प्रतिबंधक लसीचे ६८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले. महाराष्ट्रानेही लसीकरणाचा विक्रम नोंदवला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी आठ वाजेपयर्ंत १२ लाख सहा हजार ३२७ नागरिकांना लस देण्यात आली असून राज्याने नवीन विक्रम नोंदविला आहे. राज्यात आतापयर्ंत दिलेल्या एकूण डोसांची संख्या सहा कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशात उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापयर्ंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.