भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉइंट बंद

Share This News

काठमांडू
भारतात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही सतर्क झाले आहेत. भारताचा शेजारचा देश नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून नेपाळमध्ये जाण्यासाठी ३५ ठिकाणी एन्ट्री पॉईंट आहेत. त्यापैकी २२ एन्ट्री पॉईंट बंद केले असल्याचे नेपाळच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
नेपाळ आणि भारतात आता फक्त १३ ठिकाणच्या एन्ट्री पॉईंटवरून दळणवळण सुरू राहणार आहे. भारतात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळच्या कोविड संकट व्यवस्थापन समन्वय समितीने एन्ट्री पॉईंट बंद करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
भारतात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इतर देशही सतर्क झाले आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात आदी देशांनी भारतीयांना प्रवेश बंदी केली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने भारत सोडण्याची सूचना केली आहे.
शुक्रवारी भारतात एकाच दिवसांत एकूण ४ लाख 0१ हजार ९९३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर याच २४ तासांत ३५२३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ९९ हजार ९८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.