चौकशी समिति भंडाऱ्यात दाखल

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात दहा नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने समिती स्थापन करीत चौकशीचे आदेश दिले होते. या अनुषंगाने जिल्हा सामान्य रूग्णालयात सहा सदस्यीय समिती आज दाखल झाली. सुरूवातीला या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर समिती जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाली. समितीने चौकशीला सुरूवात केली असून त्या रात्री काय घडले याची रंगीत तालीम करण्यात येणार असल्याची माहीती आहे. चौकशी समिती दिवसभर याचठिकाणी असणार असल्याची माहीती आहे.नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार हे या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. एक महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.