आयएनएस हंसानचा हीरक महोत्सव

नवी दिल्ली
भारतीय नौदलाचा प्रमुख हवाई तळ आयएनएस हंसा, ५ सप्टेंबर २0२१ रोजी आपला हीरक महोत्सव साजरा करीत आहे. १९५८ मध्ये कोइम्बतूर येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांसह उभारण्यात आलेले नेव्हल जेट फ्लाइटनंतर ५ सप्टेंबर १९६१ रोजी आयएनएस हंसा म्हणून कार्यान्वित झाले. गोवा मुक्तीनंतर, एप्रिल १९६२ मध्ये दाबोळी हवाई क्षेत्र नौदलाने ताब्यात घेतले आणि जून १९६४ मध्ये आयएनएस हंसा दाबोळीमध्ये स्थालांतरित करण्यात आले.
केवळ काही विमानांसह एक माफक एअर स्टेशन म्हणून कार्यान्वित असलेल्या आयएनएस हंसाने गेल्या सहा दशकांमध्ये आपला पराक्रम वाढविला आहे आणि सध्या ४0 पेक्षा अधिक लष्करी विमानांचे संचालन ते करीत आहे, जे वार्षिक सरासरी पाच हजार तासांहून अधिक उड्डाण करीत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे २४ बाय ७ पद्धतीने हाताळून हे हवाई तळ नागरी उड्डाणांना देखील पूरक ठरले आहे, एका वर्षात सरासरी २९ हजार उड्डाणे झाली आहेत.
डॉर्नियर -२२८ विमानांसह आयएनएस ३१0 कोब्रौ, आयएनएस ३१५ विंग्ज स्टॅलियन या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांसह, आयएल- ३८ एसडी, आयएनएस ३३९ फाल्कन्स या विमानासह ३0३ ब्लॅक पँथर्स आणि ३00 व्हाइट टायगर्स सुपरसोनिक कॅरियर मधील मिग २९ के लढाऊ विमानांसह आणि हेलिकॉप्टरसह भारतीय नौदलाच्या फ्रंटलाइन एअर स्क्वाड्रनचा आयएनएस हंसा तळावर समावेश आहे. हे हवाई तळ लवकरच बोईंग या लांब पल्ल्याच्या सागरी पाळत ठेवणारे विमानासह आयएनएएएस ३१६ चे देखील व्यवस्थापन करेल.
आयएलएन हंसाचे कमांडिंग ऑफिसर सीएमडी अजय डी. थिलोफिलस म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून या तळाने नौदलाच्या लढाऊ शक्तीच्या महत्त्वपूर्ण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. हंसाचे विमान समुद्री किनारपट्टीसह संपूर्ण पश्‍चिमी समुद्र किनार्‍याची सुरक्षा लक्षणीय रितीने वाढवते आणि समुद्रावर आणि त्यातील धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी व्यापकदृष्टीनने देखरेख ठेवते. या तळावरून अधिकार्‍यांना शोध आणि बचाव, एचडीआर, पूरातील सहकार्य, सामुदायिक उपक्रम आणि असंख्य वंदे भारत विमान फेर्‍यांच्या रूपात भरीव मदत देखील प्रदान केली आहे.
आयएनएस हंसा येथे ६ सप्टेंबर २0२१ रोजी भारताच्या राष्ट्रपतींकडून नौदलाच्या परिचालन विभागाला प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान करण्याच्या प्रतिष्ठित मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा योग आयएनएस हंसाच्या हीरक महोत्सव आणि गोवा मुक्ती संग्राम यांच्याशी जुळून आला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.