लॉकडाऊन काळात दुकानदारांना मिळालेली  शिथिलता अपुरी 

मागील एक महिन्यांपासून राज्यात  लागलेल्या लोकडाऊन नंतर कोरोनाचा प्रभाव कमी होताच प्रशासनाकडून पुन्हा एकदा नियमांमध्ये शिथिलता देणे सुरु झाले आहे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील १५ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र, पॉझिटिव्हिटी दर १0 टक्केपेक्षा कमी असणार्‍या जिल्हा आणि पालिका क्षेत्रासाठी निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे , नागपूर मध्ये कोरोना चा पॉसिटीव्हिटी दर कमी असल्यामुळे आता शहरातील अत्यावश्यक सेवांसह अन्य दुकाने  दुपारी २ वा.पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर शनिवार, रविवार असे दोन दिवस केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने सुरू ठेवता येणार आहे . त्यामुळे आज पहिल्याच दिवशी शंखनाद न्यूज  ने नागपूर स्थित बर्डी येथील परिस्थिती वर नजर टाकली असता   बर्डी बाजारामध्ये  नागरिकांची  गर्दी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे .  मात्र दुकानदारांनी या शिथिलतेचा दुकानदारांना फायदा होणार नसल्याचे कबूल केले आहे त्यांच्या नुसार ग्राहकांची  वेळ सायंकाळ ची असल्यामुळे प्रशासनाकडून निर्धारित करण्यात आलेल्या वेळेमध्ये दुकानदारांची ग्राहकी होणार नाही त्यामुळे दुकानांचा वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे ,   बर्डी च्या बऱ्याच दुकानदारांनी याबाबत  शंखनाद न्यूज कडे आपली खंत व्यक्त केली आहे , पाहूया  काय म्हणणं आहे बर्डी  मार्केटच्या  दुकानदारांच

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.