दृष्टिहीन ईश्वरीचा अनोखा कारनामा, हजार मीटर पोहत जाऊन ध्वजवंदन

७२ व्या गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आज नागपूरच्या अंबाझरी तलावात एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे यांनी नागपूर शहरातील अंबाझरी तलावात सुमारे ५०० मीटर पोहत जाऊन तलावाच्या मध्यात ध्वजवंदन केलं. आज सकाळी अंबाझरी तलावाच्या पूर्व दिशेकडून ईश्वरी ने पोहायला सुरवात केली व तलावाच्या मध्य ध्वजवंदन केलं.ध्वजवंदन केल्यावर परत ५०० मीटर पोहत ती परत आली.  ईश्वरी हि केवळ ११ वर्षांची असून ती जन्मजात दृष्टीहीन आहे. असे असूनही केवळ जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर ईश्वरी ने आजचा ५०० मीटरचा पल्ला गाठून तलावात जलतरण केलं. यापूर्वी नागपूरच्या कामगार कल्याण येथील जलतरण तलावात व अंबाझरी तलावात ईश्वरीने सराव केला. सातत्य,मेहनत या गुणांना पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याचे ईश्वरीचे प्रशिक्षक सांगतात. प्रत्येक गोष्ट हि ईश्वरीकडून करवून घेणे हे थोडे कठीणच असते. जलतरण तलावात प्रशिक्षण करताना दिशा समजण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला दोर बांधावा लागत असल्याचं ईश्वरीचे प्रशिक्षक सांगतात. भविष्यात सागरी जलतरण करावे अशी ईश्वरीची इच्छा आहे. आजच्या अंबाझरी तलावात पोहण्याच्या या उपक्रमाचे अंबाझरी जल संरक्षण व संवर्धन समिती व उपस्थित नागरिकांनी ईश्वरीचे कौतुक केले. 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.