इटियाडोह धरणाच्या कालव्यात इसमाचा बुडून मृत्यू

अर्जुनी मोर-तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या कालव्यात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आलेक. दिलीप केशव मेश्राम (42) रा.बरडटोली असे मृतकाचे नाव आहे. ते काल, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी इटियाडोह धरण कालवा परिसरात गेेले होते. दरम्यान रात्री घरी न पोहोचल्याने कुटूंबियांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळाले नाही. दरम्यान,8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह धरणाच्या कालव्यात आढळून आला. पुढील तपास अर्जुनी मोर पोलिस करीत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.