मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा नाही

Share This News

नागपूर
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ अनुसार मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा ठरत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले.
गोवंशाची १८७ कातडी आढळून आल्यामुळे हिवरखेडा, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील शफिकउल्लाह खां अशफाकउल्लाह खां यांच्याविरुद्ध खामगाव पोलिसांनी १५ जुलै २0१८ रोजी एफआयआर नोंदवला होता. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा असल्याचे कायद्यात कुठेही नमूद नाही. सबब शफिकउल्लाह खां यांच्यावरील कारवाई कायम ठेवता येणार नसल्याचे सांगत यासंदर्भातील वादग्रस्त एफआयआर न्यायालयाने रद्द केला. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.