“तर तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”..खडसे संतापले

0

जळगाव JALGAW-मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादात मर्यादा सोडून वक्तव्य केली जात आहेत. एकनाथ खडसे यांना १३७ कोटी रुपयांची नोटीस आल्यामुळे त्यांनी हृदयविकाराच्या झटका आल्याचे सोंग केल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यावर संतापलेल्या खडसे यांनी महाजनांना प्रत्युत्तर दिले. माझ्या आजारपणाची सगळी कागदपत्रे तपासा आणि जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो, असे आव्हान एकनाथ खडसेंनी महाजनांना दिले आहे.(Eknath Khadse Vs Girish Mahajan war of words)
यासंदर्भात खडसे यांनी व्हिडिओ ट्विट करुन मंत्री गिरीश महाजनांना हे आव्हान दिले आहे. अलिकडेच खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलविण्यात आले होते.