जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी घेतली अमित शाह यांची भेट

Share This News

नवी दिल्ली,  10 फेब्रुवारी 

जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते पवन कल्याण यांनी मंगळवारी लोकसभा परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.  दोन्ही नेत्यांमध्ये  राजधानी, पोलावरम प्रकल्प तसेच आगामी तिरुपती लोकसभा पोटनिवडणूक आणि   आंध्र प्रदेशातील  सामाजिक, राजकीय परिस्थतीबाबत  याप्रसंगी सविस्तर चर्चा झाली. पवन कल्याण यांच्यासह  जनसेना  पक्षाचे जेष्ठ नेते नाडेडला  मनोहर देखील उपस्थित होते. जनसेना द्वारे विविध मागण्यांचे आणि राज्यातील समस्यांचे निवेदन  अमित शाह यांना सादर करण्यात आले.

मागील वर्षी  जगत प्रकाश  नड्डा यांच्या निमंत्रणावर पवन कल्याण यांनी जगत प्रकाश नड्डा यांची  नवी दिल्लीत  यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि विविध  विषयांवर  चर्चा आणि मंत्रणा केली होती. जनसेना-भाजपची अधिकृत युती असून  स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत पासून देशपातळीवर जनसेना-भाजप एकत्र काम करणार आहे. पवन कल्याण प्रथितयश  तेलुगू  अभिनेते असून  जनसेना  पक्षाचे प्रमुख आहेत तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते  मेगास्टार चिरंजीवी यांचे लहान भाऊ आहेत. पवन कल्याण पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शाह यांचे खंदे समर्थक आहेत.

चिरंजीवी यांच्या ‘ प्रजा राज्यम ‘ पक्षताही  पवन कल्याण यांनी महत्वाची भूमिका बजाविली होती. 2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी कल्याण यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद मोदी यांची गांधीनगर येथे जाऊन भेट घेतली होती. तसेच प्रचारादरमान्य  नरेंद मोदी यांनी देखील कल्याण यांचे भर सभेत कौतुक केले होते.

2014 साली  लोकसभा आणि  आंध्र प्रदेश विधानसभेत  जनसेना  पक्षाने भाजपा-टीडीपी युतीला पाठिंबा घोषित केला होता परंतु केंद्र सरकारने  आंध्र प्रदेशला  विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने त्यांनी युतीचा पाठिंबा काढला होता. 2019 च्या निवडणूक स्वबळावर लढविल्या मात्र विधान सभेत जनसेन पक्षाला फक्त एक जागा मिळाली तर लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. खुद्द  पवन कल्याण यांना गजुवाक आणि भीमावरम् विधानसभा मतदार संघातून प्रभाव पत्करावा लागला. आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभेत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.