श्रीनगरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले

श्रीनगरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. त्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावमधील यश दिगंबर देशमुख (२१) यांचा समावेश आहे. चार महिन्यांपूर्वीच यश हे सैनिकी सेवेत रुजू झाले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे. श्रीनगर येथील एका ठिकाणी मराठा रेजिमेंट १०१ बटालियनचे जवान यश देशमुख सहकाऱ्यांसह तैनात होते. तेथे अचानक तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात यश आणि उत्तर प्रदेशच्या एका जवानाला वीरमरण आले.

यश यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.