ज्युबिली मेगास्टार दादा

Jubilee Megastar Dada.

दादा कोंडके पुन्हा होणे नाही. त्यांनी चित्रपटसृष्टीत जे काय करून दाखविले ते पुन्हा आता होणे नाही. अगदी हिंदीतदेखील होणे नाही. सलग नऊ चित्रपट ज्युबिली होणे… त्यात मग सबकुछ दादा, असेच! म्हणजे निर्मती दादांची, अभिनय दादांनाचा, स्क्रिप्ट तयार करण्यात दादांचा पुढाकार. संगितकार कोण, त्याने कसे संगीत द्यावे, हे ठरविणार दादा.

दादांचा चित्रपटाच्या पडद्यावरचा प्रवेश चक्क भालजी पेंढारकर यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या दिग्दर्शनाखाली आणि आशीर्वादानं झाला. ‘तांबडी माती’ मध्ये त्यांनी दादांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपट चालला नाही. दादा चित्रपटाच्या पडद्यावर येण्याआधीच स्टार होते. त्यांच्या नावाला वलय आले होते. असे भाग्य त्या आधी कुणाला लाभले असेल असे वाटत नाही. त्यामुळे ‘तांबडी माती’ हा तमाम महाराष्ट्राच्या औत्सुक्याचा विषय होताच. तो सिनेमा चालला नाही त्याचा ठपका अर्थातच दादांवर ठेवला गेला. ‘विच्छा’नं समाजातील उच्चभ्रू, ढोंगी  मानसकितेवर कोरडे ओढले होतेच. त्याचा बदला घेण्याची ही संधी चालून आली होती. सार्‍यांनीच तांबडी माती न चालण्याचे खापर दादांच्या डोक्यावर फोडले. वगनाट्य करणे वेगळे आणि चित्रपट करणे वेगळे. उगाच भलतञयाच ठिकाणी नाक खुपसले की असेच होते… अशी जहरी टिका करण्यात आली. मात्र, भालजींनी दादांना समजावले, टिका कारांच्या या समीक्षेकडे बघू नकोस. तसे केलेस तर तू आयुष्यभर कामच करू शकणार नाहीस. दादांनी ते पथ्य नंतर आयुष्यभर पाळले.

दादांचे सलग नऊ चित्रपट ज्युबिली झाल्याने त्यांच्या नावे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला गेला. दादांची ही नवरत्नाची माळ आपण निरखून पाहूया-

सोंगाड्या-

आये, उषा, पँट आणि यश!

एकूणात भालजींचे म्हणने असे की तुझा जॉनर मला नेमकेपणाने पकडता आला नाही. तूच आता चित्रपट काढ… मग सोंगाड्याचा जन्म झाला. वसंत सबनीस यांनीच विच्छा लिहिले होते. दादांचा जॉनर त्यांना माहिती होता त्यामुळे सबनीसच योग्य होते. त्यात मग दादा आणि भालजींनी तया संहितेला फोडणी दिली. भालजींच्या संचात असलेल्या गोविंद कुलकर्णी यांच्याकडेच दिग्दशनाची जबाबदारी देण्यात आली होती. तसे भालजी पाहणारच होते मात्र कुलकर्णी होते. त्यांनीच संगीत बारी चालविणार्‍या उषा चव्हाण यांचे नाव सुचविले आणि त्यांनी सोंगाड्या करण्यासाठी होकारही दिला.

दादांच्या चित्रपट कारकीर्दीची तीन वैशिष्ट्ये सागायची झाल्यास त्यांच्या चित्रपाटतली ‘आये’, दादाच म्हणत ‘ज्याला आय नाय, त्याला काय नाय’ अर्थात या वाक्याचाही दुसरा अर्थ शोधून लोक हसून घेत. तर आये, दुसरा सिग्नेचर सिंबॉल म्हणजे उषा चव्हाण ही नायीका आणि तिसरा म्हणजे दादांची नाडेवाली हाफ पँट… सोंगाड्या पासूनच या तिनही गोष्टींनी दादांची सोबत केली ती अगदी अखेर पर्यंत. दादांच्या या चित्रपटातील भूमिकेला भक्कम आधार देणारी भूमिका म्हणजे त्यांच्या ‘आय’ची होती. बावळट वाटणारं पोरं अन् त्याची अत्यंत मायाळू पण पोराच्या भल्यासाठी वरपांगी कडकपणा धारण करणारे आय… भालजींच्या डोळ्यासमोर हे कॅरेक्टर होत. ते रत्न्ामालाबाईंच्या रूपात सापडलं आणि मग jRuekykckbZ दादांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या आयच झाल्या.

दादाची भूमिका बावळट होती. गरीब नायक होता तो. त्याला मग फाटके कपडे घालायचे काय, असा सवाल होता. फाटक्या कपड्यातून गरीबी दिसेल पण बावळटपणाचे काय? मग भालजींनी कपडेपटाची पेटी बोलावली. त्यात ही ढगळ, बेंगरुळ वाटणारी पँट दिसली. तिचा नाडा नको तितका लांब होता. भालजींनी तीच पँट दादांना घालायला दिली. दादांना त्या अवतारात बघून एकच हशा पिकला.

चित्रपट पूर्ण झाला. दादांच्या चित्रपटांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिरोईनचे नाव उषा आणि नायीकेला सुरेल आवाजही ‘उषा’ मंगेशकरांचाच. खरेतर ही गाणी राम कदम आशा भोसले यांच्याकडून संगीतबद्ध करणार होते मात्र आशा भोसले ऐनवेळी न आल्याने राम कदम यांनी ती उषा मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. यातली काय सखु आणि माळ्याच्या माळ्यामंदी, ही गाणी दादांनी आधीच चाल लावलेली आणि दादांनीच लिहिलेली होती.

सोंगाड्या प्रदर्शित झाला. त्या आधी जेव्हा जेव्हा शो करण्यात आले त बघून या क्षेत्रातील जाणती मंडळी कुचेष्टेनं सांगायची, असलं बावळट ध्यान नायक म्हणून कोण बघणार? एकूणातच हा चित्रपट चालणार नाही, असाच सार्‍यांचा हो रा होता वितरकही मिळेना. मग दादांनीच तो पुण्याच्या टॉकीजला लावला. तिथे या चित्रपटानं चक्क रौप्य महोत्सव केला. मग मुंबईच्या कोहिनूर चित्रपटगृहात चार आठवड्यांचा करार करून चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र त्या चित्रपटगृहाच्या मालकाने दुसर्‍याच आठवड्यात देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट लावायचा म्हणून दादांचा सोंगाड्या उतरविला. चार आठवड्याचा करार असूनही असे काल, या दादांच्या प्रश्नावर त्याचे उर्मट उत्तर होते. बरीच धावपळ केल्यावर दादा अखेर बाळासाहेप ठाकरे यांच्याकडे गेले नि मग बाळासाहेबांनी त्यांच्या खास ‘ठाकरी’ शैलीत हा प्रश्न सोडविला.

सोंगाड्या सुवर्णमोहत्सवी चित्रपट ठरला. शासनाचे पारितोषिकही मिळाले. दादांचा पहिलाच चित्रपट हीट ठरला होता. उत्साह वाढला होता. त्यातच मग त्यांची पुढच्या चित्रपटाची सुरू झाली होती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.