जुईली येडे बनली मिस इंडिया क्विन ऑफ नेशनची रनरअप

वर्धा ,-स्थानिक लहरीनगर येथील सामान्य कुटुंबातील जुईली येडे हिने आपल्या परिस्थीतीशी दोन हात करून नवी उडाण घेत मिस आणि मिसेस इंडिया क्विन ऑफ नेशन 2021 ची पहिली रनरअप ठरून विजेते पद घेतले. नागपूर येथील रेजेंटा सेंट्रल हॉटेलमध्ये मिस आणि मिसेस इंडिया क्विन ऑफ नेशन 2021 चे तीन दिवसीय कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या दिवशी टॅलेंट राऊंड, दुसर्‍या दिवशी फिटनेस राऊंड तर दिसर्‍या दिवशी रॅम वॉक करण्यात आले.
22 स्पर्धकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. परंतु, तीनही राऊंड मध्ये वर्ध्याची जुईली येडे हिने पहिल्याच फेरीत विजेतेपद मिळविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री तसेच 2000 ची पहिली मिस वर्ल्ड डॉ. अदिती गोवित्रीकर यांच्या हस्ते जुईल येडे हिचा क‘ाऊन घालून विशेष सन्मान करण्यात आला. जुईलीचे शिक्षण रामकृष्ण बजाज पिपरी (मेघे) येथून बि.एस्सी अ‍ॅग‘ीकल्चरमध्ये झाले असून ती आता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नागपूर येथे नोकरी करीत आहे. तिने स्वत:ची आवड जोपासत मॉडेल व कलाकर म्हणून काम करीत आहे. ती विदर्भातून पहिली मिस इंडिया क्वीन ऑफ नेशन ठरल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.