चांद्रयान-२ ची करणी, चंद्रावर सापडले पाणी

नवी दिल्ली
इस्त्रोच्या चंद्रावरील दुसर्‍या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. चांद्रयान-२ने चंद्रावर पाण्याचे अंश शोधले आहेत. प्लेजियोक्लेसच्या विशाल खडकांमध्ये चंद्रावरील अंधारात असलेल्या मैदानी भूभागापेक्षा जास्त पाण्याचे अणू साप.डले आहेत. चांद्रयानाकडून ज्या प्रकारे अपेक्षित होते, तशी माहिती मिळालेली नाही. परंतु, जी मिळाती ती महत्त्वाची आहे.
इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या मदतीने लिहिन्यात आलेल्या या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान २ मध्ये इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (आयआयआरएस) हे उपकरण बसविण्यात आले आहे. हे उपकरण वैज्ञानिक आकडेवारी मिळविण्यासाठी शंभर किमीच्या एका ध्रुवीय कक्षेशी संबंधित काम करत आहे. करंट सायन्स पत्रिकेमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयआयआरएस द्वारे टिपण्यात आलेल्या सुरुवातीच्या माहितीमध्ये २९ डिग्री उत्तरेकडे आणि ६२ डिग्री उत्तरेकडील अक्षांसामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचे छोटे छोटे कण आणि मिक्स न झालेले हाइड्रोक्सिल (ओएच) व पाण्याचे अणू स्पष्टपणे आढळले आहेत. प्लेजियोक्लेसच्या विशाल खडकांमध्ये चंद्रावरील अंधारात असलेल्या मैदानी भूभागापेक्षा जास्त पाण्याचे अणू साप.डले आहेत. चांद्रयानाकडून ज्या प्रकारे अपेक्षित होते, तशी माहिती मिळालेली नाही. परंतु, जी मिळाती ती महत्त्वाची आहे. भारताने आपले दुसरी चांद्र मोहीम २२ जुलै २0१९ मध्ये आखली होती. मात्र, चांद्रयानाला सुखरुप चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविणारा लँडर विक्रम ७ सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंग करण्यास असफल ठरला होता. चांद्रयान-२ च्या लँडरमध्ये प्रज्ञान नावाचा रोव्हरही होता. ऑर्बिटर अद्यापही चांगले काम करत आहे. तसेच चांद्रयान १ मिशनला आकडे पाठवतो.
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-२ मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासीयांचे आभार मानले होते. पृथ्वीपासून चंद्रापयर्ंतच्या आपल्या ४७ दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-२ ने अनेक अवघड टप्पे पार केले. मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.