जमिन खरेदीत खडसेंचा गैरव्यवहार, ईडीचा न्यायालयात दावा

मुंबईः पुणे जिल्ह्यात भोसरी येथील जमिन खरेदीत तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे.
ईडीने या प्रकरणात खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मंत्रि‍पदावर असताना खडसे यांनी पदाचा गैरवापर करून कुटुंबाला फायदा मिळवून दिला, असा ईडीचा दावा आहे. त्यामुळे खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन देता येणार नाही, असेही ईडीने नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी केलेल्या न्या. झोटींग आयोगाने देखील खडसे यांच्यावर ठपका ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार की कसे, ते येत्या दिवसात बघायला मिळणार आहे. दरम्यान, खडसे यांनी आपल्यामागे ईडीचा सासेमिरा लावल्यास सीडी बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. आपण पोलिसांकडे सीडी दिली असल्याचा त्यांचा दावा आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.