रेल्वे कोपरी पुलावर ४ गर्डरचे यशस्वी लॉन्च; आज रात्री ३ गर्डर बसणार

ठाणे, २४ जानेवारी, : रेल्वे कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील 7 गर्डर पैकी 4 गर्डर पहाटे पर्यंत लॉन्च करण्यात आले आहेत.  त्यावेळी ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे ,खासदार राजन विचारे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील तसेच मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (प्रकल्प निर्माण) एस एस चतुर्वेदी ,उप अभियंता (प्रकल्प निर्माण) डी डी लोलगे ,स्टेशन डेव्हलपमेंट मुख्य अभियंता आर के मिश्रा,उप अभियंता (पूल) अखिलेश सक्सेना,– मध्य रेल्वे वरिष्ठ अभियंता (सिनियर डी इ. एन) सुरेश पाखरे, ए डी आर एम आशुतोष गुप्ता व एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भामरे कार्यकारी अभियंता विनय सुर्वे त्याचबरोबर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सदर गर्डर 65 मीटर असून या 1गर्डर चे वजन 104 टन होते.  अशा 2 गर्डर जोडून बसविण्यात आले. त्याचे एकूण वजन 208 टन होते या गर्डर उचलण्यासाठी भारतात पहिल्यांदाच रेल्वेने 1200 टन वजन पेलणारी पहिलीच क्रेन कोपरी येथे  मागवण्यात आली होती. त्यामुळे ज्या अशा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी रेल्वेचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते सदर गर्डर बसविण्यासाठी 7 क्रेन, 2 पुलर, 150 हुन अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. आज रात्री पुन्हा 3 गर्डर बसविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.