२६/११ हल्ल्याचा सूत्रधार लखवीला अटक

इस्लामाबाद
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार जकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. जकीउर रहमान लखवीने हफिज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट रचला होता. असे एआरवाय न्यूजच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्याच्या तपासादरम्यान हे स्पष्ट झालं होते की, लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर लखवीला मुंबई हल्ल्यानंतर २00८ मध्ये युएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतीक दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले होते.
या हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या १0 सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ३00 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे ६ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर एप्रिल २0१५ रोजी लष्करचा ऑपरेशन कमांडर लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.