कायद्याच्या गोष्टी

सायबर गुन्ह्याचा महिला आणि बालकांवरील विळखा

सध्याच्या या कोरोना च्या काळात सायबर गुन्ह्यात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.कारण कोरोनामुळे सगळीच लोक ऑनलाईन व्यवहार करताना दिसतात आहे आणि सध्या घरातल्या घरात असल्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून जास्तीत जास्त फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,ट्विटर चा वापर वाढल्यामुळे या सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळते आहे.ते लोकांच्या मागावरच असल्याचे दिसते.सायबर गुन्हा हा फक्त व्यक्तीच नाही तर देशासाठी सुद्धा घातक झालाय आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.सायबर गुन्हा काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही.बरेच लोक यापासून अनभिद्य आहेत. मी माझ्या मागच्या “प्रसंगावधान”या लेखात थोडक्यात माहिती दिली होती पण आता सायबर गुन्ह्याचे किती प्रकार असतात ते पण थोडं सविस्तर सांगून लोकांना जागृत करावं असं वाटतं.

                   इंटरनेटमुळे जग जोडले गेले आहे. सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी अवघ्या काही क्षणांत आपल्यापर्यंत पोहोचतात. आता हेच समाज माध्यम छळाचे अस्त्र बनू पाहत आहे. प्रामुख्याने याचा फटका तरुणी, महिला, बालक यांच्यासह पुरुषांनाही बसत आहे.सायबर गुन्हे हा दिवसेंदिवस चितेंचा विषय बनतो आहे. या क्षेत्राचा दैनंदिन जीवनात अधिक वापर होऊ लागल्याने रस्त्यावरील गुन्हेगार सायबर गुन्ह्यांकडे वळले आहे. समाज माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर ही तर गुन्हेगारांसाठी खुली मैदानेच ठरत आहेत. बॅंकिंग फसवणूक, विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणुक करणे, फसवे ई-मेल पाठवणे या सर्व गुन्हयाबरोबरच एकंदर समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र बनत आहे. समाज माध्यमांपैकी व्हॉट्सॲप,इनस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर अधिक प्रमाणात केल्या जात आहे.

जगातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्येपेक्षा अधिक लोक समाज माध्यमांवर सध्या ॲक्टीव्ह आहेत. संभाषणाची सगळ्यात सोपी आणि तेवढीच गतीमान पद्धत म्हणून याकडे पाहले जाते. मात्र, जेथे जास्तजण तेथेच गुन्हेगारही आपले बस्तान बसवितात. अगदी तसाच प्रकार सायबर जगातही झाला आहे. सायबर हॅकर (गुन्हेगार) यांनी विविध माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणे, फसवणूक करणे, बदनामी करणे यासह मुळ फोटो वा दस्ताऐवजात बदल करून हेच खरे आहे असे ठासून सांगून एकप्रकारे त्या व्यक्तीची नवीच छबी तयार करतात. सध्या हा प्रकार सर्रास वाढला आहे. 

आपण प्रथम सायबर गुन्हेगारीविषयी बोलू. याचा फटका अगदी सर्वसामान्य माणसापासून ते एखाद्या देशाच्या मोठ्या कंपनीला/बँकेला बसू शकतो. 

१) फिशिंग(phishing)

उदाहरणार्थ “फिशिंग” नावाचा एक गुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घडवला जातो की, खरे म्हणजे त्याविषयी इंटरनेटचा वापर करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे. पण तरीही सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरवून किंवा फसवून त्यांचे नुकसान करतात. त्यासाठी ते आधी आपल्याला एक घाबरवणारा किंवा भोवळघालणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे …त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला…’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘लिंक’ दिलेली असते. त्या लिंकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या सायबर गुन्हेगाराने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे “तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा”वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला सायबर गुन्हेगारांचे हे काम माहीत नसल्यामुळे आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग “पासवर्ड” बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, धन्यवाद’ वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात आणि आपल्याला हायसे वाटते. पण इथेच सगळा घोटाळा झालेला असतो. सायबर गुन्हेगारांने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की, आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. तसेच हा ई-मेल त्याने अगदी आपल्या बँकेचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच आपल्या बँकेकडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या सायबर गुन्हेगारांनी दिलेली ‘लिंक’ आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या सायबर गुन्हेगाराच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण आपल्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाइप केला की, तो त्या सायबर गुन्हेगाराच्या हाती लागतो! मग तो सायबर गुन्हेगार ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या खऱ्या वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पैसे स्वत:च्या खात्यात  वळवतो.हा झाला सायबर गुन्ह्याचा एक प्रकार.

Phishing shall be punished with imprisonment upto 3 yrs and fine upto 1 lakh rupees.sec 66(D) information technology act.

२) चाईल्ड पोर्नोग्राफी( child pornography)

चाईल्ड पोर्नोग्राफीत भारत सर्वात अव्वल आहे.पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यात लहान आणि किशोरवयीन मुलांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळेच schoolgirls, teens आणि desi girls हे सर्वाधिक वापरले जाणारे key words आहेत.चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे १८ वर्षाखालील बालकांवर होणारा लैगिंक अत्याचार आणि त्याचं चित्रीकरण करणे याला चाईल्ड पोर्नोग्राफी असे म्हणतात.खाऊ, खेळणी,मोबाईल गेम इत्यादींचे  आमिष दाखवून बालकांवर लैंगिक अत्याचार केले जातात.

Child pornography sec 67 (B)shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and with a fine which may extend to ten lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to seven years and also with fine which may extend to ten lakh rupees:

३) सायबर ग्रुपिंग (cyber grouping )

समाज माध्यम किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे मुलांचं लैंगिक किंवा अन्य प्रकारे शोषण करण्याच्या उद्देशाने जवळीक निर्माण केली जाते.सायबर ग्रुमर भेटवस्तू,प्रशंसा,मॉडेलिंगमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष देत जवळीक वाढवतात.पुढे अश्लील संदेश,छायाचित्र किंवा व्हिडीओ  पाठवू लागतात.पुढे आपले नुड्स फोटो,खाजगी फोटोसह व्हिडीओ पाठविण्यास सांगतात.आणि अशाप्रकारे ते लैंगिक शोषण करू शकतात.

Cyber grooping shall be punished with imprisonment for a term which may extend to three years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.sec 66 (B) Information technology act.

४) सायबरबुलिंग (cyberbullying)

स्त्रियांना, मुलींना धमकी देत त्यांना मानसिक त्रास दिला जातो.अश्लील किंवा हानिकारक संदेश,टिपण्या आणि व्हिडीओ पाठवून एखाद्याला त्रास देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानचा वापर केला जातो.सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकूर,संदेश,ई-मेल,सोशल मीडिया, संकेतस्थळ, चॅट रूम्स इत्यादींचा वापर करतात.यामुळे गंभीर स्वरूपाचे भावनिक, शारीरिक,सामाजिक आणि मानसिक परिणाम जाणवतात.

Cyber bullying shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years and with fine.section 66 -(A) of IT act.

५)  मॉर्फिंग(morphing)

सायबर मॉर्फिंग मध्ये एखाद्या  व्यक्तीचं मूळ छायाचित्र बदललं जातं.महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून,अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाईल बनविले जातात.

Morphing shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to three years and with fine which may extend to five lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and also with fine which may extend to ten lakh rupees. only if you like it.(Section 67 in The Information Technology Act).

६) सायबर डिफेमेशन( cyber defamation)

चुकीचं विधान करून व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचवीली जाते.चारित्र्य हननाच्या उद्देशाने ई – मेल किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली जाते.

Cyber defamation sec 77(B)punishable with imprisonment of three years and above shall be cognizable and the offence punishable with imprisonment of three years shall be bailable.

७) सायबर स्टॉकिंग( cyber stalking)

एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाईन हालचालींचा पाठलाग करणे,त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांची वयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे.अशी संवेदनशील माहिती गोळा करून सायबर स्टाकर नाव,कौटुंबिक पार्श्वभूमी,आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे पीडितेच्या दैनंदिन व्यवहारात प्रवेश करतो.शिवाय पीडितेच्या नावाने  संबंधित वेबसाईटवर माहिती पोस्ट करतो.

Cyber stalking shall be punished with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.(sec 72 of Information technology act)

८) ऑनलाईन गेमिंग(online gaming)

मुलं मोबाईल, संगणक,पोर्टेबल गेमिंग डिवाईसचा वापर करून सोशल नेटवर्क वर ऑनलाईन गेम खेळतात.उदाहरणार्थ:- ब्लू व्हेल, पब जी मात्र याच ऑनलाईन गेमिंग च्या अतिरेकापायी मुलं चोरी,आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांना बळी पडतात.

समाज माध्यमांचा वापर करताना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. विशेषकरून महिलांनी तर सावधगिरी बाळगली पाहिजेच. फोटो, माहिती, संपर्क क्रमांक, पत्ता यासारख्या वैयक्तिक बाबी शेअर करू नयेत. याच माहितीचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात आणि त्याआधारे महिलांना फसवले जाते किंवा त्यांचा छळ केला जातो.समाज माध्यमांचा अशाप्रकारे गैरवापर केल्या जाऊ शकतो.

– प्रेमास नकार दिल्यामुळे बदनामी 

– लग्नाचे आमिष देऊन फसवणूक 

– चित्रफीत, फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल 

– भांडणाचा बदला घेण्यासाठी अपप्रचार 

– अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल 

– फोटोमध्ये छेडछाड करून दुरूपयोग. 

अशाप्रकारे समज माध्यमांचा दुरुपयोग होऊ शकतो तर सावधान राहून समाज माध्यमांचा वापर करायला हवा तर त्यासाठी महिला, मुलं, पुरुष ह्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्या:- 

– अनोळखी व्यक्तीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवू नका अथवा स्वीकारू नका.

– समाज माध्यमांवर फोटो, व्हिडीओ सर्वांनाच दिसतील, असे ठेऊ नका. 

– महिलांनी संपर्क, पत्ता तसेच इतर वैयक्तिक माहिती टाळावी.

– व्हॉट्सॲपवर डीपी, स्टेटस ठेवताना जपून ठेवा.

– सायबर कॅफेमधून समाज माध्यमांचा वापर करताना विशेष काळजी घेणे  आवश्यक आहे.

– आयडी, पासवर्ड कुणी पाहणार नाही, याची खबरदारी घ्या .

अशाप्रकारे आपण सावध राहिलो तर आपल्याला कुणी फसविण्याचा प्रयत्न करणार नाही आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा जो आहे तो आपोआप सुटेल.चला तर मग सावधगिरीने आपण आपले सगळे व्यवहार करूया.

ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार

सदस्य, बालन्याय मंडळ,चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.