समाजाला प्रकाशाची वाट दाखवा : विवेक घळसासी खुशाल ढोक यांना रमाबाई रानडे पुरस्कार प्रदान

Share This News

नागपूर, ता.२: “करुणा, कृतज्ञता, उत्तरदायित्व, जबाबदारी आणि संवेदनशीलता ही पंचसूत्री अंगीकारून समाजहित म्हणून शिक्षणाचा वसा घेतलेल्या शिक्षकांची खरी गरज असून असे शिक्षक आणि असा विचार रुजविणाऱ्या सेवा सदन सारख्या संस्था खर्या अर्थाने बलशाली राष्ट्र उभारण्यात योगदान देतात” असे प्रतिपादन प्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यानी आज केले.
सेवा सदन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सेवा सर्वदा संस्थेचे खुशाल ढाक याना यावर्षीचा पुरस्कार प्रसिद्ध निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर संस्थेच्या अध्यक्षा सौ कांचन गडकरी, रा. तु म नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, आमदार ना गो गाणार, कार्याध्यक्ष वासंती भागवत उपस्थित होते.
घळसासी पुढे म्हणाले की, या देशात अनेक सकारात्मक गोष्टी दररोज घडतात. शिक्षण क्षेत्रातही असे आहे, परंतु दुर्दैवाने नकारात्मक बाबींवर प्रकाश टाकण्यात माध्यमांना स्वारस्य आहे. अंधाराची चर्चा करण्यापेक्षा प्रकाशाची वाट समाजाला दाखवा असे आवाहन त्यानी केले.
दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
प्रास्ताविकातून संस्थेच्या अध्यक्षा सौ कांचन गडकरी यानी या पुरस्काराची पार्श्वभूमी विषद केली. समाजातील सत्य असत्याचे आणि बऱ्या वाईटाचे पारदर्शक पणें अवलोकन करून समाजहित जोपासणाऱ्या संस्थेचे, व्यक्तीचे कौतुक करणे, पाठीवर थाप देणे हे कुणाचे तरी कर्तव्य आहे. सेवा सदन संस्थेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. पुरस्काराचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. पण शिक्षणासाठी समाजातील अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवेचे व्रत घेतलेल्या संस्था शोधून त्यांना पुरस्कार देताना विषेश समाधान वाटत आहे. सेवा सदन ही राष्ट्रीय विचाराची संस्था असून रमाबाई यांच्या प्रेरक कार्याला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्या म्हणाल्या.
कुलगुरु डॉ सुभाष चौधरी म्हणाले की, नकारात्मक शक्तींवर मात करून धडाडीने काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करणे ही मोलाची बाब आहे. सेवा सदन यात सातत्य ठेवले आहे हे अभिनंदनीय आहे. मनोगत व्यक्त केले.
पुरस्काप्राप्त खुशाल ढाक यावेळी बोलताना भाऊक झाले. सेवा सदन सारख्या संस्था माझ्यासारख्या व्यक्तींची दखल घेत राहतील तो पर्यंत गोर, गरीब, वचितां साठी काम करणाऱ्यांना बळ मिळेल असेही ते म्हणाले.

सेवा सदन च्या शिक्षकांनी सरस्वती स्तवनाने या आभासी सोहळ्याची सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन सौ ऋचा घावडे यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी आभार मानले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.