दादासाहेब कन्नमवार यांच्या विचार कार्याची ज्योत राज्यभर प्रज्ज्वलित करा-सुनील केदार

दादासाहेब कन्नमवार यांची १२१ वी जयंती नागपूर विधानभवन प्रांगणात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश गजभिये होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडामंत्री सुनील केदार उपस्थित होते. भटक्या विमुक्तांच्या व बेलदार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बैठक घेऊन प्रलंबित विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केदार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.