कांद्याच्या पोत्याखालून दारू तस्करी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या Liquor Smuggling

12 लाखांचा मुद्देमालसह दोन आरोपीना अटक ; हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई 

वर्धा : दारुची तस्करी करण्यासाठी नागपुरातील तस्करांनी आता अनोखी शक्कल वापरण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात कांद्याच्या पोत्याखालून दारुची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

विदर्भातील दारु तस्करांनी अफलातून शक्कल लढवत कांद्याच्या बहाण्याने दारुची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. हिंगणघाटात कांद्याखाली दारु लपवून मद्य तस्करी केली जात असल्याचं समोर आलं. वर 300 पोते कांदे आणि खाली तब्बल 12000 दारुच्या बाटल्या लपवून दारुची तस्करी केली जात होती. कांदे दरवाढीचा दारु तस्कर असाही वापर करतील याचा कोणी विचारही केला नसेल. हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत यात वय (२३) रविदासनगर,वॉर्ड नं.०४,मूर्तीजापूर जि.(अकोला) व बाबूलाल सिद्धार्थ सदानशिव वय (३०) रा. लंगापूर पोई, ता.मूर्तीजापूर, जि. अकोला अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहे.

12000 दारुच्या बाटल्यांसह 300 पोते कांदेही जप्त केले. यावेळी दारु तस्करांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कायवाई उपविभागियाय पोलिस आधींकरी भीमराव टेळे,ठाणेदार सत्यविर बंडीवार यांच्या मार्गदर्शन गुन्हे अन्वेषण पथकाचे हवालदार शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे,सचिन घेवंदे,विशाल बंगाले,सचिन भारशंकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.