बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार

Share This News

बीड : कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. महाराष्ट्रातील बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह तब्बल 22 तास पडून राहिला आहे. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गुरुवारी रात्री नऊ वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह जवळपास वीस तास कोविड वार्डातच पडून होता. विशेष म्हणजे या मृतदेहाशेजारी दोन महिलांवर उपचारदेखील सुरू होते. हा संतापजनक प्रकार जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील कोविड वार्डात घडला आहे. हा मृतदेह 22 तास तसाच राहिल्यानं या कोविड वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मनोबलाचं खच्चीकरण होतं आहे.
पडून राहिल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनानं तो बाहेर काढला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र ही बाब उघड झाल्यानंतर नातेवाईकांसोबतचं रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.